भाषिक उपक्रम १

१) शब्द चक्र--- यात गोल आकारात  एक अक्षर लिहायचे व त्या अक्षरापासून तयार होणारे शब्द गोलाकार लिहायचे .


-------------------------------------------------------------

२) शब्द गाडी --  यात हस्त खेळत मुले शब्द शिकतात.  एक शब्द देऊन त्या  शब्दाच्या  शेवटच्या अक्षरापासून पुढचा शब्द लिहायचा. जसे - आमचा - चाक - कप - पतंग - गवत - तलवार - रवा - वार - रथ - थवा - वाघ - घर - रस - ससा - साखर - रतन....
---------------------------------------------------------------------------------
३) शब्द डोंगर --- एक शब्द देऊन त्यापासून एक वाक्य तयार करायचे. प्रत्येक वाक्यात एक एक वाढवत जायचे . जसे-
शाळा 
शाळा सुंदर आहे.
शाळा खूपच  सुंदर आहे.
शाळा खूपच सुंदर व छान आहे.
शाळा आमची खूपच सुंदर व छान आहे 
शाळा आमची खूपच सुंदर व छान आम्ही रोज शाळेला जाणार .



No comments: