लघुखेळ (विनासाहीत्य )

१)शिवाशिवी:- शिक्षकाने मैदानाची मर्यादा ठरवून देऊन एका विद्यार्थ्यास राज्य देण्यास सांगावे .इतरांनी  मैदानात उभे राहावे.शिक्षकाने इशारा करताच इतरांनी पळावे व राज्य देणाऱ्याने त्यांच्या पैकी कोणालाही शिवण्याचा प्रयत्न करावा.जो बाद होईल त्याने राज्य द्यावा. तसेच चकवताना पळणारा ठरवून दिलेल्या मर्यादित क्षेत्राच्या बाहेर गेल्यास त्याला बाद समजून त्याच्यावर राज्य द्यावा.अशा प्रकारे खेळ चालू ठेवावा.   

2)विष -अमृत:- मर्यादित क्षेत्रात उभे राहावे.एकाने राज्य द्यावा.शिक्षकाच्या इशाऱ्यावर खेळास सुरवात  करावी.राज्य देणारा कोणत्याही एका विद्यार्थ्याला शिवेल. शिवले जाण्याची शक्यता वाटल्यास लगेच त्याने खाली बसावे.तो बसताच राज्य देणाऱ्याने त्याच्या डोक्यावर हात ठेवावा व विष म्हणावे. त्यानंतर बसलेल्या विद्यार्थ्याने जागा सोडू नये. पळणाऱ्या पैकी  कोणीही राज्य देणाऱ्याला चकवून बसलेल्या विद्यार्थ्याच्या  डोक्यावर हात ठेवावा व अमृत म्हणावे.त्यामुळे तो जिवंत होऊन पळणाऱ्यांमध्ये  सामील होईल.यावेळी राज्य देणाऱ्याने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना बसवण्याचा प्रयत्न करावा.व बसलेल्यांना अमृत देण्यासाठी येणाऱ्यांना  बाद करण्याचा प्रयत्न करावा. बाद  झाल्यास त्याने राज्य द्यावा व शिवणाऱ्याने पळायला जावे.प्रकारे खेळ सुरु ठेवावा.  
3)राम राम पाव्हणं:- सर्व विद्यार्थ्यांनी गोलाकार उभे राहावे. एका विद्यार्थ्यांने राज्य द्यावा.बाकीच्यांनी वर्तुळावर आत तोंड करून उभे राहावे.राज्य देणाऱ्याने वर्तुळाभोवती पळण्यास सुरुवात करावी. पळताना कोणत्याही एका विद्यार्थ्याच्या  पाठीला हात लावावा. ज्याच्या  पाठीला हात लागला त्या विद्यार्थ्याने राज्य देणाऱ्याच्या उलट दिशेने पळण्यास सुरुवात करावी जेथे दोघे भेटतील  तेथे त्यांनी एकमेकांना नमस्कार करून राम राम पाव्हणं  असे म्हणावे व रिकामी असलेली जागा पकडण्यासाठी आपापल्या दिशांनी पळावे. ज्याला जागा मिळणार नाही त्याने राज्य द्यावा.अशा प्रकारे खेळ सुरु ठेवावा.
४) चोर -पोलिस 
५)वाघोबा आला , पळा पळा  
६) तळ्यात मळ्यात 
७)वाघ शेळी
८)पक्षी भुर्रर्र 
९)डोंगर का पाणी  
१०)  

No comments:

Post a Comment