सूर्य नमस्कार : कृती
मूळ स्थिती : सावधान , छातीवर हातांचा नमस्कार घाला.
एक : श्वास घ्या.हातांचा नमस्कार सरळ वर घ्या. तेव्हाच कमरेतून जास्तीत जास्त मागे झुका.
दोन : श्वास सोडा.कमरेतून पुढे सावकाश वाका.गुडघे ताठ .हातांचे तळवे जमिनीवर टेकवा.डोके गुडघ्यांना लावा.
तीन : श्वास घ्या.एक पाय मागे घेऊन चवडा जमिनीवर टेकवा.
चार : श्वास सोडा.दुसरा पायही मागे घेऊन पहिल्या पायाप्रमाणेच चवड्यावर जवळ जवळ ठेवा.
पाच : श्वास घेऊ नका.हात कोपरातून वाकवत छाती जमिनीजवळ घ्या.कपाळ जमिनीला टेकवा.
सहा : श्वास घ्या.शरीर पुढे ताणत डोके वर उचला व मागे ताणा.
सात : श्वास सोडा.कमर वर उचला.डोके दोन्ही हातांच्या मध्ये घेऊन हनुवटी छातीला लावा.
आठ : श्वास घ्या.एक पाय पुढे घेऊन दोन हातांच्या मध्ये ठेवा.शरीराची स्थिती तीन प्रमाणे .
नऊ : श्वास सोडा.दुसरी पायही पुढे घेऊन पहिल्या पायाजवळ ठेवा.शरीराची स्थिती दोन प्रमाणे.
दहा : नियमित श्वासोच्छवास करत मूळ स्थितीत या.
No comments:
Post a Comment